आधुनिक या भारताचा रचयिता जयभीम आहे. अन पुरातन मान्यतांचा खातमा जयभीम आहे. दूर आता व्हा न अडवा या भिमाच्या लेकरांना, बा- प्रयोजन चालला हा कारवा जयभीम आहे. देत नाही मुल्य समता त्यामुळे तर उलटपक्षी, हा उरावर विषमतेच्या वेंगला जयभीम आहे. यातणेवर मात केली पण न केली देश दुफळी, देशप्रेमी एकतेचा दाखला जयभीम आहे. वाचवा ही राज्यघटना आपल्याला लाभलेली, हीच आता हाक आम्हा देत हा जयभीम आहे. कोणत्या हो काढल्या या गगणचुंबी दगड मुर्त्या, महत किर्ती पाहिली तर आसमा जयभीम आहे. बात ही 'रविपाल' अपुल्या तू मनावर बिंबवावी, शिक्षणाणे धन्य व्हावे हा धडा जयभीम आहे. गझलकार : डॉ. रविपाल भारशंकर
गझलेच्या संपूर्ण इतिहासात प्रथमच गणभंग न करता वृत्त वजनाचा वापर !