Skip to main content

Posts

Showing posts from November, 2019

गझल : १८. बहर : खफ़ीफ मुसद्दस मख़बून (फ़ाइलातुन मुफ़ाइलुन फ़ेलुन) गालगागा लगालगा गागा

भाकिले पण उलट दशा झाली. राम भक्ती मरा मरा झाली. मद्य पी मी नसून, हे पाहा.. होशवाली मला नशा झाली. भेटलो अन तुला, बरा झालो.. व्यर्थ आधी किती दवा झाली. कांच भगवे निळे हरे नसता, छान दृष्टी अता सफा झाली. श्वास 'रविपाल' रे कसा घ्यावा? भ्रष्ठ सारी पहा हवा झाली! गझलकार : डॉ. रविपाल भारशंकर

गझल : १७. वृत्त : आनंदकंद

तू ज्ञान हे तुझे का पेटून देत नाही? काहीच जर तुझ्या ते कामात येत नाही! जोडून काय करणे संबंध मृण्मयाशी, अवसान हे कधीही मुर्द्यास नेत नाही! तात्काळ योजनेवर तेंव्हाच अमल केला, केंव्हाच ठेविला मी राखून बेत नाही. असतात करत अपुले वाटेल ते मनाला, बहुतेक या जनांना पर्याप्त चेत नाही! 'रविपाल' ऐक माझा हा एक प्रश्न आता, काहून तू स्वतःचे संज्ञान घेत नाही? गझलकार : डॉ. रविपाल भारशंकर

गझल : १६. वृत्त : आनंदकंद

जाणीव हीच जर का नसणार माणसाला. माणूस कोण आहे म्हणणार माणसाला? दुःखात माणसाचे आयुष्य सर्व गेले, आनंद काय सांगा असणार माणसाला. माणूस जोवरी हा भगवान होत नाही, संदर्भ माणसाचा हसणार माणसाला. हे लोक फार मोठ्या संख्येत वाढले जे, नक्कीच मार याचा बसणार माणसाला. 'रविपाल' मीपणाचे उपटून दात घे हे, माणूस पण किती तू डसणार माणसाला! गझलकार : डॉ. रविपाल भारशंकर

गझल : १५. वृत्त : गागागागा गागालगा

मज दिधले ते घेऊन बघ. माझ्या जागी येऊन बघ. आनंदाने राहीन मी, घर तू मजला देऊन बघ. धन सोबत हे घेऊन जा, येते का ते नेऊन बघ. असतो नसतो देव हा, भाळी अपुल्या लेऊन बघ. ऊन्हामध्ये 'रविपाल' अव, अव'ती भवती अन ऊन बघ. गझलकार : डॉ. रविपाल भारशंकर

गझल : १४. वृत्त : गालगागा गालगागा गागालगा

वाटते की लागला हा! पण; फैसला. फक्त असतो कोणताही क्रम फैसला. पलटणाऱ्या अवयवाचे तर नाव मन! करत असते का कधी हे मन फैसला? गझलकार : डॉ. रविपाल भारशंकर

गझल : १३. वृत्त : मंजुघोषा

काय सांगू काय झाले शेवटी मग. जे न व्हावे तेच झाले शेवटी मग. जवळ आले भेट झाली गुंतले अन, एक दिवशी दूर झाले शेवटी मग. थाट होता हे खरे पण सांगना की, काय त्याचे हाल झाले शेवटी मग. होत नाही हेच मजला वाटले पण, मस्त पैकी छान झाले शेवटी मग. गझलकार : डॉ. रविपाल भारशंकर

गझल : १२. वृत्त : वागुरा + सती (गालगालगा लगालगागा)

बेमतलबची मिजास केली. वेळ हातची निघून गेली. लोप पावले रिवाज नसले, तेल काढतो म्हणून तेली. काय मस्त ही वडाप्रमाणे, लोमकाळली अन् थाय वेली. टाक दौत मग रिफील आली, यूज थ्रो अता अजून जेली. शेर हा 'रवी' असून मकता, पुर्ण जाहली गझल नवेली. गझलकार : डॉ. रविपाल भारशंकर

गझल : ११. वृत्त : मंजुघोषा

खूप झाले जहर अँटी-डोट घेतो. फक्त आता अमृताचा घोट घेतो. दिसत आहे डाग काही राहिलेले, एक अजुनी हात यावर कोट घेतो. हेच झाले सुत्र आता जिंकण्याचे, नोट देतो तोच ज्यादा वोट घेतो. फाडतो जो वस्त्र आधी तोच नंतर, शेवटी मग सीवताना गोट घेतो. हा असा रविपाल सौदा ठीक नाही, पाठ करुनी जे विकत तू पोट घेतो. गझलकार : डॉ. रविपाल भारशंकर

गझल : १०. वृत्त : हिरण्यकेशी

असाच तू हा जरी निघाला दिमाखमारी करावयाला. दिमाख आहे तरी तुला का दिमाखमारी करावयाला. कुठेतरी का असाच नाही तसाच तिकडे निघून गेला? उगाच इकडे कशास आला दिमाखमारी करावयाला. जरा जराशा प्रयोजनाणे दिमाख जर का खराब होतो, विचार करतो तरी कशाला दिमाखमारी करावयाला. अखेर त्याला चिडून मग मी अशाप्रकारे बजावले की, फिजूल लावू नकोस मजला दिमाखमारी करावयाला. दिमाख म्हणजे अटीतटीच्या कवायतीचा प्रदेश असुनी, फुकात रविपाल' हा निघाला दिमाखमारी करावयाला! गझलकार : डॉ. रविपाल भारशंकर

गज़ल : ९. वृत्त : आनंदकंद

चोरी करू नका हा सिद्धांत मांडणारे. झाले कसे फरिश्ते? देवत्व चोरणारे! मुर्ती जवळ पुजारी उडवून टर म्हणाला, देतात बघ कसे मज, तुज लोक मागणारे! तू लावली तिकीटे हे फार छान झाले, आले तसे पळाले फुकटात पाहणारे! वातावरण अशाने निवणार काय सांगा? विझवायला निघाले जर आग लावणारे! 'रविपाल 'या मुळेही की जात भेद नाही, शहराकडे वळाले गावात राहणारे! गझलकार : डॉ. रविपाल भारशंकर