खूप झाले जहर अँटी-डोट घेतो.
फक्त आता अमृताचा घोट घेतो.
दिसत आहे डाग काही राहिलेले,
एक अजुनी हात यावर कोट घेतो.
हेच झाले सुत्र आता जिंकण्याचे,
नोट देतो तोच ज्यादा वोट घेतो.
फाडतो जो वस्त्र आधी तोच नंतर,
शेवटी मग सीवताना गोट घेतो.
हा असा रविपाल सौदा ठीक नाही,
पाठ करुनी जे विकत तू पोट घेतो.
गझलकार : डॉ. रविपाल भारशंकर
फक्त आता अमृताचा घोट घेतो.
दिसत आहे डाग काही राहिलेले,
एक अजुनी हात यावर कोट घेतो.
हेच झाले सुत्र आता जिंकण्याचे,
नोट देतो तोच ज्यादा वोट घेतो.
फाडतो जो वस्त्र आधी तोच नंतर,
शेवटी मग सीवताना गोट घेतो.
हा असा रविपाल सौदा ठीक नाही,
पाठ करुनी जे विकत तू पोट घेतो.
गझलकार : डॉ. रविपाल भारशंकर
Comments
Post a Comment