जाणीव हीच जर का नसणार माणसाला.
माणूस कोण आहे म्हणणार माणसाला?
दुःखात माणसाचे आयुष्य सर्व गेले,
आनंद काय सांगा असणार माणसाला.
माणूस जोवरी हा भगवान होत नाही,
संदर्भ माणसाचा हसणार माणसाला.
हे लोक फार मोठ्या संख्येत वाढले जे,
नक्कीच मार याचा बसणार माणसाला.
'रविपाल' मीपणाचे उपटून दात घे हे,
माणूस पण किती तू डसणार माणसाला!
गझलकार : डॉ. रविपाल भारशंकर
माणूस कोण आहे म्हणणार माणसाला?
दुःखात माणसाचे आयुष्य सर्व गेले,
आनंद काय सांगा असणार माणसाला.
माणूस जोवरी हा भगवान होत नाही,
संदर्भ माणसाचा हसणार माणसाला.
हे लोक फार मोठ्या संख्येत वाढले जे,
नक्कीच मार याचा बसणार माणसाला.
'रविपाल' मीपणाचे उपटून दात घे हे,
माणूस पण किती तू डसणार माणसाला!
गझलकार : डॉ. रविपाल भारशंकर
Comments
Post a Comment