चोरी करू नका हा सिद्धांत मांडणारे.
झाले कसे फरिश्ते? देवत्व चोरणारे!
मुर्ती जवळ पुजारी उडवून टर म्हणाला,
देतात बघ कसे मज, तुज लोक मागणारे!
तू लावली तिकीटे हे फार छान झाले,
आले तसे पळाले फुकटात पाहणारे!
वातावरण अशाने निवणार काय सांगा?
विझवायला निघाले जर आग लावणारे!
'रविपाल 'या मुळेही की जात भेद नाही,
शहराकडे वळाले गावात राहणारे!
गझलकार : डॉ. रविपाल भारशंकर
झाले कसे फरिश्ते? देवत्व चोरणारे!
मुर्ती जवळ पुजारी उडवून टर म्हणाला,
देतात बघ कसे मज, तुज लोक मागणारे!
तू लावली तिकीटे हे फार छान झाले,
आले तसे पळाले फुकटात पाहणारे!
वातावरण अशाने निवणार काय सांगा?
विझवायला निघाले जर आग लावणारे!
'रविपाल 'या मुळेही की जात भेद नाही,
शहराकडे वळाले गावात राहणारे!
गझलकार : डॉ. रविपाल भारशंकर
Comments
Post a Comment