Skip to main content

गझल : १७. वृत्त : आनंदकंद

तू ज्ञान हे तुझे का पेटून देत नाही?
काहीच जर तुझ्या ते कामात येत नाही!

जोडून काय करणे संबंध मृण्मयाशी,
अवसान हे कधीही मुर्द्यास नेत नाही!

तात्काळ योजनेवर तेंव्हाच अमल केला,
केंव्हाच ठेविला मी राखून बेत नाही.

असतात करत अपुले वाटेल ते मनाला,
बहुतेक या जनांना पर्याप्त चेत नाही!

'रविपाल' ऐक माझा हा एक प्रश्न आता,
काहून तू स्वतःचे संज्ञान घेत नाही?

गझलकार : डॉ. रविपाल भारशंकर


Comments