Skip to main content

गझल : २०. वृत्त : आनंदकन (जू काफ़िया मिसाल)

प्रत्येकदा नसावे चिकटून या मनाला.
केंव्हा तरी रहावे सोडून या मनाला.

पाहून बुत मलाही का वाटते असे की,
गालामधे हसावे चकवून या मनाला?

आहे तरी जवळ का लावायला दवाई,
घायाळ जर करावे बोलून या मनाला?

मी ऐकले परत हे येते कधी तरी मन,
ये एकदा म्हणावे परतून या मनाला!

'रविपाल' रे मनाची मैत्री तुला जडाली,
जर वाटते रडावे बिलगून या मनाला.


गझलकार : डॉ. रविपाल भारशंकर

Comments