Skip to main content

गज़ल १. वृत्त: आनंदकंद.

फळली मला कधीही नाही कृषी मुळावर.
मारूनही फवारा पडली अळी फुलावर.

कर्जास या अता मी फेडायचे कशावर,
लागत तरी निघाली नाही कुण्या पिकावर.

जीएम बी बियाणे पेरायला मनाई,
शेती कशी करावी या तुगलकी तिरावर.

जर रास्त दर मिळाला मालासही कृषीच्या,
मरणार मी कशाला लटकूनिया सुळावर.

'रविपाल' कर अता या सरकारची अवज्ञा,
धोरण अरे तयाचे उठले तुझ्या जिवावर.

'रविपाल' तू कितीदा ऋण फेडले तरीही,
विळखा महाजनांचा पडला तूझ्या घरावर.

गज़लकार : डॉ. रविपाल भारशंकर

(९२ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन यवतमाळ २०१९, येथे कवीकट्टा या मंचावर सादरीकरणाकरीता निवड झालेली गझल. दि. १३/०१/२०१९.)

Comments

Popular posts from this blog

गझल : १६. वृत्त : आनंदकंद

जाणीव हीच जर का नसणार माणसाला. माणूस कोण आहे म्हणणार माणसाला? दुःखात माणसाचे आयुष्य सर्व गेले, आनंद काय सांगा असणार माणसाला. माणूस जोवरी हा भगवान होत नाही, संदर्भ माणसाचा हसणार माणसाला. हे लोक फार मोठ्या संख्येत वाढले जे, नक्कीच मार याचा बसणार माणसाला. 'रविपाल' मीपणाचे उपटून दात घे हे, माणूस पण किती तू डसणार माणसाला! गझलकार : डॉ. रविपाल भारशंकर

गझल : २१. वृत्त : मंजुघोषा

ऐक माझी ही विनंती आज देवा. कोण आहे मी मला हे सांग देवा. छंद काही बोलण्याचा सुटत नाही, काय असते सांग ना रे मौन देवा. पाहतो 'रविपाल' आहे सर्वकाही, पण तयाला होत नाही ज्ञान देवा.

गज़ल ६. वृत्त : स्वानंदसम्राट + शेतकरी (गागालगागा गागालगागा) + (गागागा गागालगागा) ९३ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन २०२० उस्मानाबाद येथे सादरीकरणाकरीता निवड झालेली गझल

बचती अभावी केली हमेशा घाट्याच्या सौद्यात शेती. सांगा कशी सापडणार नाही कर्जाच्या विळख्यात शेती. शेतात माझ्या थोडा तरी या पैशाचा पाऊस पाडा, असतो करत मी वाजिब दराच्या दुष्काळी पट्ट्यात शेती. लावून चारा करतात जैसा न्यौछावर बकरा बळीचा, लुटतात अगदी तैसीच बिल्कुल मदतीच्या बदल्यात शेती. बैलाप्रमाणे जोखंड नसले मानेवर माझ्या तरीपण, आहे करत मी या शासनाच्या कानूनी फास्यात शेती. देशात एके काळात होती शेती ही सर्वात उत्तम, पण आज ठरली दर्जात दुय्यम साऱ्याची याच्यात शेती. 'रविपाल ' आहे कल्याणकारी लोकांचे गणराज्य हे तर, देशोधडीला का लागली ही लोकांच्या राज्यात शेती ? गज़लकार : डॉ. रविपाल भारशंकर (९३ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे कवीकट्टा या मंचावर सादरीकरणाकरीता निवड झालेली गझल. दि. १२ जानेवारी २०२०)