असते कशी शहादत पाहून या तुम्ही.
सीमेवरी जराशे जाऊन या तुम्ही.
नंतर करा जगाला रोशन कधी तरी,
घर आपले अगोदर बारून या तुम्ही.
तुमच्या खुळेपणाला फळ लागले खुळे,
आतातरी हुशारी पेरून या तुम्ही.
भगवा निळा नि हिरवा एकत्र या इथे,
हा आपला तिरंगा फडकून या तुम्ही.
खचलेत मृत बळीचे परिजन अशा क्षणी,
'रविपाल' जा तयांना भेटून या तुम्ही.
गज़लकार : डॉ. रविपाल भारशंकर
Comments
Post a Comment