कोणी जरी न म्हटले तुजला कधी बरे.
करतो स्वतः मुखाने तू आपले खरे.
जावे परी हमेशा यावे परत पुन्हा,
तेथेच त्या ठिकाणी राहू नये अरे!
फोफावले असेही हे गाव की अता,
बाहेरही शिवेच्या विस्तारली घरे.
विहिरीत या तरीही पाणी न लागले,
फुटले जरी श्रमाणे अंगावरी झरे.
'रविपाल' मन गळू दे केंव्हातरी तुझे,
देतो तुला शुभेच्छा मंगल हरे हरे!
गज़लकार : डॉ. रविपाल भारशंकर
करतो स्वतः मुखाने तू आपले खरे.
जावे परी हमेशा यावे परत पुन्हा,
तेथेच त्या ठिकाणी राहू नये अरे!
फोफावले असेही हे गाव की अता,
बाहेरही शिवेच्या विस्तारली घरे.
विहिरीत या तरीही पाणी न लागले,
फुटले जरी श्रमाणे अंगावरी झरे.
'रविपाल' मन गळू दे केंव्हातरी तुझे,
देतो तुला शुभेच्छा मंगल हरे हरे!
गज़लकार : डॉ. रविपाल भारशंकर
Comments
Post a Comment