रे, विभूती द्वेष जर का करत आहे तू!
मुर्ख नाही तर म्हणावे काय आहे तू?
जवळ येता स्वच्छ झाले तेच सारे जे,
दूर असता म्हणत होता भ्रष्ट आहे तू!
अंध नाही पण तरीही अंधतेविन का?
मार्गदर्शन आंधळ्यांचे घेत आहे तू!
उत्तरांनी सुटत नाही प्रश्न कारण की,
प्रश्न नाही कोणताही प्रश्न आहे तू!
जिंदगी 'रविपाल' नाही एकट्याची ही,
रूप असलो मी तरीही नाव आहे तू!
गझलकार : डॉ. रविपाल भारशंकर
मुर्ख नाही तर म्हणावे काय आहे तू?
जवळ येता स्वच्छ झाले तेच सारे जे,
दूर असता म्हणत होता भ्रष्ट आहे तू!
अंध नाही पण तरीही अंधतेविन का?
मार्गदर्शन आंधळ्यांचे घेत आहे तू!
उत्तरांनी सुटत नाही प्रश्न कारण की,
प्रश्न नाही कोणताही प्रश्न आहे तू!
जिंदगी 'रविपाल' नाही एकट्याची ही,
रूप असलो मी तरीही नाव आहे तू!
गझलकार : डॉ. रविपाल भारशंकर
Comments
Post a Comment